> About Stem Cell Therapy
About Stem Cell Therapy Centre
गुडघेदुखीवर प्रभावी उपचार पद्धती:
गुडघेदुखी: अर्थात ऑस्टिओअर्थराइटिस ऑफ़ नी-जॉईंट हा एक वयोमानाप्रमाणे हाडांची झीज होऊन होणारा आजार आहे. अमेरिकेत १० मिलियन लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

भारतात याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. चाळीशीतील जवळपास ४७% महिलांमध्ये गुडघेदुखीचा त्रास जाणवतो.

चाळीशीनंतर व मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन नामक हार्मोन स्त्रीयांमध्ये कमी होत असल्यामुळे हाडांची झीज जास्त प्रमाणात होते.

गुडघेदुखीमुळे होणारा त्रास म्हणजे मुख्यत: गुडघा दुखणे, सुजणे, चालतांना व पायर्या चढतांना व उतरतांना प्रचंड वेदना होणे, हालचालींवर मर्यादा येणे व त्यामुळे येणारे परावलंबत्व, या सर्वांमुळे येणारे नैराश्य ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

आजपर्यंत उपलब्ध उपचार पद्धतीला गुडघेदुखी कमी करण्यासाठी मुख्यत: वेदनाशामक गोळ्या, इंजेक्शन, व्यायाम, वजन कमी करणे, आहारात बदल व शेवटचा उपाय म्हणजे गुडघ्याचे प्रत्यारोपन (Knee Replacement) ज्याला हजारो रुपये खर्च येतो. गुडघेदुखीमध्ये प्रामुख्याने सांध्यातील कार्टीलेज (दोन सांध्यातील गादी) झिजल्यामुळे सांधे एकमेकांना घासले जातात व त्यानंतर प्रचंड वेदना सुरु होतात.

२१ व्या शतकात वैद्यकीय शास्त्रात केलेल्या संशोधनामुळे गुडघेदुखीवर अतिशय प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे. स्टेमसेल थिएरपी ही आजच्या काळातील सर्वात सोपी व प्रभावशाली उपचार पद्धती आहे.

स्टेमसेल थिएरपी चे फ़ायदे
स्टेमसेल हे हाडाच्या खराब झालेल्या (Cartilage) हाडामधील गादीला बदलुन नवीन (Cartilage) मध्ये रुपांतरीत करते व सांधा पूर्ववत होण्यासाठी मदत करते.

   1) स्टेमसेल थिएरपीसाठी ऑपरेशनची गरज नाही.

   2) हॉस्पिटल मध्ये ॲडमीट होण्याची गरज नाही.

   3) भूल देण्याची गरज नाही.

   4) स्टेमसेलचे एक इंजेक्शन व सांधा पूर्णपणे बरा!